कोरोना काळातील अनुभवी डॉक्टरांचे सरकारला वावडे, नवा टास्क फोर्स स्थापन; मुंबईतील एकही डॉक्टर नाही

कोविडचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सर्व क्षेत्रातील परिपूर्ण अनुभव असलेल्या डॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन केला होता. पण विद्यमान सरकारने पुनर्रचनेच्या नावाखाली अनुभवी डॉक्टरांचा टास्क फोर्स बरखास्त करून टाकला आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती केली आहे. मात्र कोविडचा मुकाबला करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मुंबईतील एकाही डॉक्टरचा यामध्ये समावेश केलेला नाही.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई चे संचालक, बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणेचे डॉ. राजेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेजच्या डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेजचे डॉ. डी. बी. कदम हे टास्क पर्ह्सचे सदस्य असतील. आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचे आयुक्त या टास्क पर्ह्सचे सदस्य सचिव असणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केईएमचे माजी डीन डॉ. संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली पहिला टास्क पर्ह्स स्थापन केला होता. या टास्क पर्ह्समध्ये डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. राहुल पंडित, डॉ. अविनाश सुपे, डॉ. शशांक जोशी आदींचा समावेश होता. कोरोनाच्या तिसऱया लाटेत महाविकास आघाडीने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी हिंदुजा रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क पर्ह्स बनवला होता.

महाविकास आघाडीचा टास्क फोर्स बरखास्त

महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या टास्क पर्ह्समध्ये खासगी क्षेत्रातील वेगवेगळय़ा तज्ञ डॉक्टरांचा समावेश केला होता. त्यामध्ये मधुमेहापासून बालरोगतज्ञांचाही समावेश होता. त्याचा मोठा फायदा कोविड नियंत्रणात झाला होता. पण या सरकारने स्थापन केलेल्या केलेल्या टास्क फोर्समध्ये फक्त सरकारी डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टरांच्या अनुभवावर कोणालाही शंका नाही, पण मुंबईतील खासगी डॉक्टरांचा या फोर्समध्ये समावेश करणे गरजेचे आहे, असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थापन झालेल्या डॉक्टरांनी कोरोना नियंत्रणात आणण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. जागतिक पातळीवर या टास्क फोर्सचे काwतुक झाले होते.