
बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चांगल्याच भडकल्या. या रुग्णालयाला आज त्यांनी अचानक भेट देत रुग्णालयातील अस्वच्छतेवरून कर्मचाऱ्यांची अजितदादा स्टाईल झाडाझडती घेतली.
स्वच्छता अशी असते का? काम करता की, नुसताच मोबाईल बघता? अशा प्रश्नांची सरबत्ती करत सुनेत्रा पवार यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्याचवेळी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांनी अडीअडचणी जाणून घेतल्या.




























































