माऊंट एव्हरेस्टवर जाम! गिर्यारोहकांच्या लांबच लांब रांगा

जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टर गिर्यारोहकांनी अक्षरशः जाम केल्याचे चित्र आहे. तब्बल 200 गिर्यारोहकांनी 8 हजार 790 मीटर उंचीवर दक्षिण शिखर आणि हिलरी स्टेप गाठले. 8 हजार 848 मीटर उंच माऊंट एव्हरेस्ट येथून 200 फूट दूर आहे. येथे गर्दी जमल्याने येथे बर्फाचा काही भाग तुटल्याचेही दिसले.

यावेळी 6 गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्टवरून अडकून पडले. 4 जण दोरीच्या सहाय्याने परत वर येण्यात यशस्वी झाले, तर एक ब्रिटिश आणि नेपाळी असे दोन गिर्यारोहक हजारो फूट खाली पडले आणि बर्फात गाडले गेले. ही घटना 21 मे रोजी घडली होती, ज्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. चार दिवसांपासून बर्फात अडकल्याने दोन्ही गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. हे दोघेही एव्हरेस्टवर चढणाऱया 15 गिर्यारोहकांच्या गटातील होते. जेव्हा बर्फाचा काही भाग तुटला तेव्हा ते दक्षिण शिखराच्या दिशेने पडले. याला टेकडीचा डेथ झोन असे म्हणतात, येथे ऑक्सिजनची पातळी खूप कमी असते.

419 गिर्यारोहकांची नोंद

यंदा विक्रमी 419 गिर्यारोहकांना परवाने देण्यात आले. यात 343 पुरुष आणि 76 महिला होत्या. यावेळी 62 देशांतील गिर्यारोहकांच्या 43 मोहिमा होत्या. जूनच्या पहिल्या आठवडय़ात वर्षभराची मोहीम संपणार आहे. यावेळी हिंदुस्थानातील 29 गिर्यारोहकांनी एव्हरेस्टची चढाई पूर्ण केली. नेपाळ पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार गिर्यारोहकांव्यतिरिक्त 181 शेर्पादेखील एव्हरेस्टच्या वेगवेगळय़ा मोहिमांमध्ये सामील होते, असे बेस पॅम्पचे प्रमुख खिम लाल गौतम यांनी सांगितले. अखेर न्याय मिळाला…