सुकीवली चव्हाणवाडी येथे दोन दुचाकींची धडक; दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड तालुक्यातील सुकिवली कर्टेल रस्त्यावरील चव्हाण वाडी नजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होत झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. सुनील तुकाराम यद्रे (वय 42) व राजेंद्र विलास चौगुले( वय 40) अशी जखमींची नावे आहेत. जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रूग्णवाहीने कळबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडला.

तुकाराम सुनील यद्रे दुचाकीने कर्टेल हुन सुकिवलीकडे येत होते. त्याच वेळी राजेंद्र विलास चौगुले दुचाकीने कर्टेलकडे जात होते. या दोन्ही दुचाकी चव्हाणवाडी येथे आल्या असता दोन्ही दुचाकीस्वारांचा ताबा वाहनांवरील सुटला आणि त्या दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. थेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.