चिनी शिष्टमंडळाकडील रहस्यमय बॅगमुळे खळबळ

जी 20 शिखर परिषदेसाठी आलेल्या चिनी शिष्टमंडळाकडील एका रहस्यमय बॅगेमुळे ताज पॅलेस हॉटेलमध्ये गेल्या आठवडय़ात तब्बल 12 तास एक नाटय़ रंगले होते. चिनी प्रतिनिधींची ही बॅग तपासण्याची मागणी सुरक्षा अधिकाऱयांनी केली. या तपासणीस चिनी सदस्यांनी नकार दिल्यावर सतर्क सुरक्षा यंत्रणांनीही त्यांच्या खोलीबाहेर सुरक्षा अधिकारी तैनात केले. 12 तास ही काsंडी कायम राहिल्यावर अखेर ही रहस्यमय बॅग चिनी सदस्यांनी दूतावासाकडे पाठवली आणि या नाटकावर पडदा पडला.

‘ताज पॅलेस’मध्ये आलेल्या या शिष्टमंडळाच्या बॅगांची तपासणी करण्याची मागणी सुरक्षा अधिकाऱयांनी केल्यावर त्यांनी राजनैतिक शिष्टाचाराचे कारण सांगत नकार दिला. यावरून गोंधळ वाढू लागल्यामुळे ‘राजनैतिक नियम’ विचारात घेत सुरक्षा कर्मचाऱयांनी या बॅगा आत नेण्यास परवानगी दिली, मात्र एका कर्मचाऱयाने या सामानातील एका बॅगेत काही ‘संशयास्पद उपकरणे’ असल्याची तक्रार केल्यावर सुरक्षा अधिकाऱयांनी ही बॅग स्पॅनरमध्ये ठेवण्यास चिनी सदस्यांना सांगितले. या तपासणीस त्यांनी नकार दिल्यावर तीन सुरक्षा अधिकारी त्यांच्या खोलीबाहेर खडा पहारा देत काही तास उभे होते. हिंदुस्थानचे सुरक्षा अधिकारी मागणीवर ठाम राहिल्यामुळे अखेर या बॅगा दिल्लीतील चीनच्या दूतावासात पाठवण्याचे सदस्यांनी मान्य केले.