
जवस हे आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड म्हणून ओळखले जाते. लहान जवसाच्या बियांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि ते अनेक आरोग्य फायदे देतात. या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराला असंख्य फायदे देतात. आहारात जवसाचे सेवन केल्याने कोणते रोग कमी होऊ शकतात आणि त्यात कोणते पोषक घटक आहेत हे जाणून घेऊया.
जवस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
जवसात ओमेगा–3 आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार राहते व केस मजबूत होतात. विशेषतः महिलांसाठी जवस उपयुक्त आहे. यात लिग्नॅन्स असतात जे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. जवसमधील पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
जवसामध्ये ओमेगा–3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच जवसामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, पोट साफ राहते आणि पचनसंस्था निरोगी राहते.
जवस खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. जवसमधील विद्रव्य फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
जवस कसे खावे?
भाजून पूड करून दररोज 1–2 चमचे घ्यावे.
चपातीच्या पिठात किंवा भाजी/सलाडमध्ये मिसळून खाता येते.
कोमट पाण्यासोबतही घेऊ शकता.



























































