
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कधीही विरोध केला नव्हता, असे स्पष्ट करतानाच 2024 च्या निवडणुकीतच हे आरक्षण लागू करावे, अशी आग्रही मागणी आघाडीने केली होती, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपला केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना करायची होती, असा आरोप त्यांनी केला आहे.
महिलाना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी कांग्रेस आणि इंडिया आघाडीने कोणताही विरोध केला नव्हता. २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू करण्याचा आग्रह काँग्रेस आणि इंडिया आघाडीने केला होता. परंतु भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली आपल्या फायद्याची मतदारसंघ पुनर्रचना करायची होती. पण ही… pic.twitter.com/GCQ9tL8TiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 18, 2026
यशोमती ठाकूर यांनी पुढे असेही नमूद केले की, भाजपने आखलेली ही ‘मनुवादी रणनीती’ लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाली नाही. महिलांच्या हक्कांच्या नावाखाली स्वतःचे राजकीय हित जपण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला, मात्र विरोधी पक्षांनी हा डाव ओळखून तो हाणून पाडला आहे असे ठाकूर यांनी म्हटले आहे




























































