यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वीज कोसळून बैल मृत्युमुखी

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

नागपुर येथील आयएमडीने वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व गारा पडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित ठिकाणी रहावे असा इशारा पण दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, मारेगाव तालुक्यात ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे प्रचंड उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मारेगाव तालुक्यातील आकापुर शेत शिवारात सराईसाठी गेलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल जागीच मृत पावला आहे.

मारेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये हलक्या गारासह पाऊस पडला. यादरम्यान कापूर येथील नारायण खंडाळकर यांची बैल जोडी शेत शिवारात चरत असताना अचानक बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल जागीच ठार झाला. यात शेतकऱ्याचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसाकरिता ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केल्या गेला आहे.