मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन, पोलिसांचा तपास सुरू

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ मंत्रालयात शोध मोहिम सुरू केली आहे. हा फोन नगर येथून आल्याचे समजते. गेल्या 15 दिवसांत अशा प्रकारचा फोन येण्याची ही दुसरी वेळ आहे.