महाराष्ट्राची कबड्डी हीच आयपीएल! खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी क्रीडांगणाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, बाबा कदम उपस्थित होते.

महाराष्ट्राचा खरा खेळ कबड्डी आहे, महाराष्ट्राची कबड्डी हीच आयपीएल आहे. शिवसेना नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी असते आणि पाठीशी सदैव राहणार, असा ठाम विश्वास देत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज कबड्डीपटूंचे धैर्य वाढवले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या वतीने विक्रोळीत आयोजित कबड्डी स्पर्धेचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना व मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आमदार चषक कबड्डी स्पर्धा भरवण्यात आली आहे. 21 एप्रिलपर्यंत टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात कबड्डीचा थरार रंगणार असून आज या स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. मुंबईतील सर्वाधिक रोख रकमेची स्पर्धा असलेल्या या कबड्डी थरारात व्यावसायिक स्पर्धेतील विजेत्यांना दोन लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तर उपविजेत्या संघाला दीड लाखाचे व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला पाऊण लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. राज्यभरातील विविध कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून पहिल्याच दिवशी प्रो कबड्डीच्या सुपरस्टार्सनी कबड्डीचा थरार दाखवला.

कामगार नेते संदीप राऊत, विभाग संघटक रश्मी पहुडकर, परम यादव, सिद्धी जाधव, दीपक सावंत, विश्वास शिंदे,  सुनीता जाधव, श्वेता पावसकर, चंद्रशेखर जाधव, निलेश साळुंखे, दीपाली पाटील,  वंदना बेंद्रे, संतोष शिंदे, सचिन मदने, रवी महाडिक अभय राणे, प्रकाश पुजारी, निलेश पोहकर, सुनीता सांगडे, आसावरी भोईटे, प्रिया गावडे, संदीप सावंत, शंकर ढमाले, अनंत पाताडे, धर्मनाथ पंत, सचिन चोरमले, दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (मार्टके डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, राणा तिवारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे राजन अधटराव यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांचा उत्साह अधिक वाढला.