
अनेक वर्षे हिंदुस्थानने अमेरिकेचा फायदा घेतला. त्यांनी आमच्यावर प्रचंड शुल्क लादले आणि स्वतः काहीच दिले नाही. पण आता परिस्थिती पूर्णपणे उलट आहे आणि आम्ही हिंदुस्थानकडून चांगला नफा कमवत आहोत, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ते व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख एक चांगला मित्र असा केला. मला तुमचे पंतप्रधान खूप आवडतात. ते माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आमचे आपापसात उत्तम जमते. आमचे संबंध खूप मजबूत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. तसेच हिंदुस्थान आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#WATCH | President Donald Trump says, “For years, India took advantage of the United States… They charged us tremendous tariffs and paid nothing… Now it is the exact reverse and we are making a lot of money with India. But we will get to a deal because I like your Prime… pic.twitter.com/IR2x2MqUV5
— ANI (@ANI) June 4, 2026
नवी दिल्लीत 1 ते 4 जून दरम्यान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये व्यापार कराराबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये वस्तूंचा व्यापार, सीमाशुल्क प्रक्रिया, बिगर-शुल्क अडथळे, व्यापार सुलभता आणि आर्थिक सुरक्षा सहकार्य यावर सखोल चर्चा झाली. याच दरम्यान ट्रम्प यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले. यावेळी त्यांनी अमेरिकेची प्रसिद्ध मोटरसायकल कंपनी हार्ले-डेव्हिडसनचाही उल्लेख केला.
हार्ले-डेव्हिडसन हिंदुस्थानात येऊ देत नव्हते. हिंदुस्थानने त्यावर 200 टक्के आयात शुल्क लावले होते. दुर्दैवाने हे माझ्या कार्यकाळापूर्वी घडले होते. त्यांना त्यांच्या दुचाकी अमेरिकेत विक्री करायच्या होत्या आणि आम्ही त्यांच्याकडून कोणताही करत घेत नव्हतो, असे ट्रम्प म्हणाले.




























































