
हिंदुस्थानी तरुणांवर लंडनमध्ये साऊथहॉल येथे चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरभेज सिंग (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र चौकशीनंतर सहा जणांना सोडून देण्यात आले, तर एकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

























































