वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन लढाऊ विमान कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
us-military-fighter-jet-crashes-in-washington-state-rimrock-lake-pilot-safe

अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील जंगल परिसरात लष्करी लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर जंगलात वणवा लागला. वैमानिकाने प्रसंगावधान राखत वेळीच उडी घेतल्याने तो बचावला असून किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिमरॉक लेकजवळ ही दुर्घटना घडली.