मोदी सरकारचे विकासदराचे आकडे खोटे, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारकडून सादर केला जाणारा देशाचा विकासदराचा आकडा 7.7 टक्के नसून, तो केवळ 2.7 टक्क्यांच्या आसपास असल्याचा दावा हिंदुस्थानचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. ‘मोदी सरकार खोटे आकडे सांगून देशवासीयांच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

पुणे जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित चर्चासत्रामध्ये ‘आजची भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर सिन्हा बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार उपस्थित होते.

सिन्हा म्हणाले, ‘2047पर्यंत देशाला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. विकसित राष्ट्र होण्यासाठी दरवर्षी किमान आठ टक्के विकासदर साध्य करावा लागेल. मात्र, सध्याची धोरणे पाहता, हा विकासदर साध्य करणे अशक्य आहे.’

‘आखातात यापूर्वीही युद्धे झाली आहेत. मात्र, कोणत्याही सरकारने पेट्रोल-डिझेल आणि गॅसवर नियंत्रण आणले नाही. सध्या देशात अघोषित रेशनिंग सुरू असून, महागाईचा भार सरकार जनतेवर टाकून हात झटकत आहे,’ असे टीकास्त्र्ा त्यांनी सोडले.

मोजक्या मित्रांसाठी नोटाबंदीचा घाट घातला गेला. पण बाजारातील सुमारे 99.99 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या. काळा पैसा पकडल्याचा एकही खटला दाखल
झाला नाही.

‘टेलिप्रॉम्टर’शिवाय मोदी भाषण करू शकत नाहीत!

‘प्रखर वक्ता म्हणून ओळख असलेली व्यक्ती ‘टेलिप्रॉम्टिंग’शिवाय भाषण करू शकत नाही. चुकून टेलिप्रॉम्टर बंद पडला तर ‘आज नाष्टा केला का? जेवण केलं का?…’ असे प्रश्न ते विचारतात. देशातील माध्यमांना ‘टेलिप्रॉम्टर दिसता कामा नये,’ असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, परदेशात गेल्यावर इतर माध्यमांपुढे मोदींची तारांबळ उडते.

ते तर ‘गुरुघंटाल’!

‘मोदींना ‘विश्वगुरू’ संबोधले जाते,’ या प्रश्नावर सिन्हा म्हणाले, ‘मोदी जगभरामध्ये ‘विश्वगुरू’ म्हणून स्वतŠला मिरवत आहेत. ते स्वतŠला ‘विश्वगुरू’ म्हणत असले, तरी या देशातील प्रत्येकाला वस्तुस्थिती माहीत आहे. ते विश्वगुरू नसून, ‘गुरुघंटाल’ आहेत.’