कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्याने बाइक पेटवली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र या कर्जमाफीत लादण्यात आलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडल्याची भावना निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी राज्यातील विविध भागांत सरकारविरोधात आंदोलन केले. कोणत्याही अटीविना ‘सरसकट कर्जमाफी’ मिळावी या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे एका संतप्त शेतकऱ्याने शासनाचा निषेध करत भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवून दिली आहे. ‘शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, अन्यथा यापुढे नेते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवायला मागेपुढे पाहणार नाही,’ असा इशाराही दिला आहे.