Ratnagiri News – महावितरणने तोडलेल्या फांद्या रस्त्यावर टाकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीजतारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरणने तोडल्या, मात्र तोडून टाकलेल्या फांद्या रस्त्याच्या शेजारी टाकून देण्यात आल्या आहेत. या टाकून दिलेल्या फांद्या उचलणार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रत्नागिरी शहरातील चर्चरोड परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजतारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या आज दुपारी तोडल्या. तोडून टाकलेल्या फांद्या रस्त्याच्या शेजारी टाकून महावितरणचे कर्मचारी निघून गेले. आता रस्त्याच्या शेजारी तोडलेल्या फांद्यांचा ढीग पडला असून त्या उचलणार कोण? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.