Jammu Kashmir – कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी परप्रांतीय कामगारांना लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील केलम परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. सध्या, सुरक्षा यंत्रणा हल्ल्याच्या सखोल तपास करत असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

हल्ल्यात गोळी लागल्यानंतर दोन्ही जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे डॉक्टरांनी एका कामगाराला मृत घोषित केले. दुसऱ्या जखमी कामगाराची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.