
आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलीवूडचा भाईजान सलमान खान धावून आला आहे. सलमानने पूरग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ‘ग्लोबल सिख्स’ या स्वयंसेवी संस्थेशी हातमिळवणी केली आहे. सलमानने पुरामुळे बेघर झालेल्या लोकांसाठी 500 अर्ध-कायमस्वरूपी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.




























































