
जम्मू आणि कश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी मोठा रस्ते अपघात झाला. सशस्त्र सीमा बल (एसएसबी) च्या ताफ्यातील तीन वाहने केला मोर बोगद्यात एकमेकांना धडकली. या अपघातात एसएसबीचे तीन जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, एसएसबीचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात असताना केला मोर बोगद्यात एका वाहनाने अचानक ब्रेक लावले. निसरड्या रस्त्यांमुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या वाहनांना नियंत्रण ठेवणे कठीण झाले. त्यामुळे मागची दोन वाहने एकमेकांना धडकली. यामुळे तीन जवान जखमी झाले.





























































