फँचाईजी देण्याच्या नावाखाली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुरिअरसह ई-कॉमर्स कंपनीच्या फ्रँचाईजी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने बेडय़ा ठोकल्या. पोलिसांनी कॉल सेंटरवर कारवाई करून नऊ जणांना अटक केली. त्या सर्वाना अटक करून न्यायालयात हजर केले होते. मालाड येथील एका सोसायटीत एक कॉल सेंटर सुरू असून ई-कॉमर्स कंपनीच्या फँचाईजी देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहायक निरीक्षक पूनम यादव, गणेश तोडकर आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी कारवाई करून 105 हार्ड डिस्क, 32 लॅपटॉप, 30 मोबाईल, 5 टॅब आणि काही कागदपत्रे जप्त केली. या टोळीने आतापर्यंत 20 जणांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.