अशोक पत्की यांच्या गाजलेल्या गीतांची पर्वणी; प्रभादेवीत आज ‘शब्द सुरांची मैफिल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर आधारित ‘शब्द सुरांची मैफिल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात पार पडणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमाला अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर उपस्थित राहणार आहेत. धनंजय म्हसकर, अनघा पेंडसे, प्राजक्ता सातार्डेकर, अभिषेक नलावडे गाणी सादर करणार असून मयूरेश साने निवेदन करणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.