
काँग्रेसच्या नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘हार्परकॉलिन्स इंडिया’ हे पुस्तक हिंदुस्थानात प्रकाशित करणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशन सोहळा होणार आहे. त्याचे प्रकाशन ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ ही संस्था करणार होती. मात्र मजुकरामध्ये काही बदलांवरून मतभेद निर्माण झाल्यानंतर ‘पेंग्विन’ने करारातून माघार घेतली होती.





























































