
महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर सध्या देशभरात नागरिक, महिला संघटना आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करत आहेत.महिलांवरील वाढते अत्याचार आणि सार्वजनिक ठिकाणी असुरक्षिततेचे वातावरण यांमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहेत. यावर आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी त्यांनाच शिक्षा देणे थांबवावे असे सांगत सुरक्षिततेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणींच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. राहुल गांधी त्यात म्हणाले की, देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत, महिलांना घरातच डांबून ठेवणे हा प्रश्नावर उपाय नसून गुन्हेगारांना शिक्षा देणे आणि रस्ते सुरक्षित करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. तसेच, सरकारचा हा दृष्टिकोन पुरुषांच्या मानसिक विचारांचे प्रतीक असून, सुरक्षिततेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या तरुण पिढी विशेषतः जेनझी (GenZ) तरुणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Stop punishing women for the crimes committed against them.
Across our country, women are afraid to walk the streets, afraid of being harassed, afraid of being raped. And the government’s answer: stay at home.
This is patriarchy at work: a system that blames the victim and… pic.twitter.com/f3lgqB3wQs
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 29, 2026
महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांसाठी त्यांनाच शिक्षा देण्याचे प्रकार तातडीने थांबवले पाहिजेत. आज देशभरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून त्या रस्त्यावर चालण्यास, छेडछाडीला बळी पडण्यास किंवा बलात्काराच्या भीतीमुळे धास्तावलेल्या आहेत. मात्र, यावर सरकारचे उत्तर केवळ ‘घरातच राहा’ असे आहे. हे स्पष्टपणे पितृसत्ताक व्यवस्थेचे दर्शन घडवते, जिथे पीडितेलाच दोष दिला जातो आणि गुन्हेगारांना संरक्षण दिले जाते. आता ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. या समस्येवर महिलांना घराबाहेर पडण्यापासून रोखून कुलूपबंद करणे हा उपाय नाही, तर रस्ते अधिक सुरक्षित करणे, महिलांशी दुर्व्यवहार करणाऱ्या पुरुषांच्या विकृत मानसिकतेचा सामना करणे आणि महिलांवर हल्ले करणाऱ्यांना कोणताही अपवाद न ठेवता तात्काळ आणि कठोर शिक्षा देणे हाच एकमेव उपाय आहे. सरकार जनतेच्या वेदना आणि संकटांकडे दुर्लक्ष करत असून, जोवर दबाव निर्माण होत नाही, तोवर ते जनतेचे ऐकणार नाहीत. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही अधिकार असून, या संघर्षात आपण आंदोलकांसोबत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



























































