ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर (PIL) पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सहमती दर्शवली आहे. आयोगातील अन्य दोन निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील आयोगाने घेतलेल्या निर्णयांच्या पद्धतीला या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा तातडीच्या सुनावणीसाठी उल्लेख करण्यात आला.