
Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या नीरू ढांढाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ट्रॅप शूटिंग एकेरीत फायनलमध्ये चीन आणि कुवैत सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात खेळताना तिने सर्वोच्च खेळाच प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावलं. नीरूने फक्त सुवर्णपदकच पटकावलं नाही, तर 30 पैकी 28 अचूक निशाणे साधत ऐशियन गेम्सचा विक्रम उद्ध्वस्त केला. त्याच बरोबर ट्रॅप शूटिंग एकेरित सुवर्णपदक जिकणारी नीरू हिंदुस्थानची पहिली महिला शूटर ठरली आहे.
ऐशियन गेम्सच्या 75 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही हिंदुस्थानी महिला शूटरला ट्रॅप एकेरीत सुवर्णपदक पटकावता आलं नव्हतं. हा 75 वर्षांचा दुष्काळ नीरूने संपुष्टात आणत ऐशियन गेम्समध्ये आपला तिरंगा अभिमाने फडकावला. या विजयासह चीनच्या सुन युनगोंगने रौप्य आणि कुवैतच्या हजर अब्दुलमलिकने कांस्यपदक जिंकले आहे. हिंदुस्थानने 1928 मध्ये रणधीर सिंह यांच्या विजयानंतर तब्बल 48 वर्षांनी ट्रॅप शूटिंगच्या एकेरी प्रकारात पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याशिवाय, नीरूसाठी हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरले असून तिने यावर्षी जुलैमध्ये इटलीतील शॉटगन वर्ल्ड कपमध्येही सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला होता.





























































