
होम लोनचा हप्ता वेळेत किंवा सलग भरला नाही, पहिला किंवा दुसरा हप्ता चुकला तर बँक तुम्हाला एसएमएस, ई–मेलद्वारे आठवण करून देते आणि विलंब शुल्क आकारते.
ओव्हरडय़ू रकमेवर सुमाने दरमहा 1 -3 टक्के दंडात्मक व्याज लागते. 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास सिबिल स्कोअर 50-70 गुणांनी कमी होऊ शकतो.
मुदतीत पैसे भरले नाही तर बँक गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करते. लिलावाच्या सूचनेनंतर एक महिन्याच्या कालावधीत हप्ता भरला नाही तर, लिलावाची प्रक्रिया सुरू होते.
अशा स्थितीत बँक तुम्हाला ईएमआय पुनर्रचना किंवा कालावधी वाढवून हप्ता कमी करण्याचा पर्याय देऊ शकते. शक्य होईल तसे इतर पर्याय वापरून संकट टाळता येते.
90 दिवसांच्या आत हप्ता जमा केला नाही तर त्याचा परिणाम व्रेडिट स्कोअरवर होईल. तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात येईल. भविष्यात बँक तुम्हाला कर्ज देणार नाही.





























































