
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनात मोठे बदल करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतर, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आंदोलनासाठी तीन नवीन ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड यांचा समावेश आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. अभिजीत दीपके यांनी, आंदोलनाच्या निश्चित स्थळांच्या यादीतून जंतर मंतर वगळल्याबद्दल टीका करताना म्हटले की, ते आता आंदोलनाचे ठिकाण राहिलेले नाही. त्यांनी जंतर मंतरला रणांगण बनवल्याचा आरोप केला. “आता संपूर्ण देशच जंतर मंतर बनेल.”
They have removed Jantar Mantar as a designated protest site.
Yes, it’s no a longer protest site as anyway it was turned into a war zone by the coward dictator.
Ab poora desh Jantar Mantar banega!
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 12, 2026
आंदोलनाच्या स्थळांमधील बदलावरून सुरू असलेल्या राजकीय आणि सार्वजनिक चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. दीपके यांनी आंदोलनाची नोंदणी करण्याच्या स्थळाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. आता आंदोलनासाठी तीन स्थळे निवडण्यात आली आहेत. यामध्ये रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड. दिल्ली पोलिसांनी या बदलामागे सुरक्षेची कारणे दिली आहेत.



























































