सिंहासन खाली करो….; शशी थरूर यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोदी सरकारची मनमानी आणि दडपशाहीच्या विरोधात देशभरात संतापाची लाट पसरली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून, आज इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. विरोधी पक्षातील सर्व नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान या आंदोलनापूर्वी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा सुरू आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कवी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या ‘जनतंत्र का जन्म’ (लोकशाहीचा जन्म) या प्रसिद्ध कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत.

या कवितेच्या माध्यमातून शशी थरूर यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. ज्याप्रकारे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशातील जनता रस्त्यावर उतरली आणि स्वत: हक्कासाठी या दडपशाही सरकारविरोधात लढली. त्याचप्रमाणे आता देखील
मुख्य निवडूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी जनता पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. जेव्हा सामान्य जनता हुकूमशाही किंवा अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन आपला रोष व्यक्त करते, तेव्हा सिंहासनावर बसलेल्या लोकांना पायउतार व्हावे लागते, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

या पोस्टसोबतच थरूर यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना या मोर्चाची सविस्तर माहिती दिली आहे.

मुंबई पोलीसही दिल्लीप्रमाणे वागले; आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर, आंदोलकांना उचलून फरफटत नेले