
कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह कार्यकर्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाली आहे. मात्र जामीन देण्यापूर्वी सीजेपी नेत्यांना एका वर्षासाठी शांतता भंग न करण्याची अट घालण्यात आली आहे. यावरून सौरव दास यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. संविधानाने अधिकार दिला आहे तोपर्यंत आंदोलन करणारच, असा इशारा सौरव दास यांनी सरकारला दिला.
सीजेपी नेता सौरव दास यांनी दिल्लीतून माध्यमांशी संवाद साधला असून दडपशाही सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले की, सरकारने हे समजून घेतले पाहिजे की लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी त्यांना एका जागेची गरज असते. सध्या ‘जंतर मंतर’ हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण आहे आणि लोकांना तिथेच जायचे आहे. जेव्हा एखादी संघटना ‘इंडिया गेट’वर आंदोलन करण्याची घोषणा करते, तेव्हा पोलीस सांगतात तुम्ही जंतर मंतरवरच आंदोलन करू शकता. मग यावेळी लोकांनी ठरवलं आहे की जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करायच. मग तुम्ही त्यांना का रोखत आहात? असा सवाल सौरव यांनी उपस्थित केला.
Delhi: CJP Co-Convenor Saurav Das says, “The government must understand that people have the right to protest and need a place to do so. At present, Jantar Mantar is the designated protest site, and people want to go there. You may have seen that when an organization announces a protest at India Gate, the police sometimes visit its members and tell them that they cannot protest at India Gate and must go to the designated protest site at Jantar Mantar. This time, when we said we wanted to go to Jantar Mantar, how can they stop people? They are forcing people to protest on roads elsewhere. We have come to the police today to discuss this issue. It is very unfortunate that Sachin Sharma, who used to call us 15–20 times a day during the first phase of the Jantar Mantar protests, cannot even look us in the eye today. He came into the room where we were sitting, saw us and ran away. The Additional DCP also left. If police officers refuse to speak to us, how can they then accuse us of doing this or that?…”
— IANS (@ians_india) October 12, 2026
आंदोलन तर सोडाच, पण रस्त्यावर फिरण्यासाठी देखील रोखले जात आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही आज पोलिसांकडे आलो आहोत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की, जंतर मंतर आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आम्हाला दिवसातून 15-20 वेळा फोन करणारे सचिन शर्मा आज आमच्या नजरेला नजरही भिडवू शकत नाहीत. आम्ही जिथे बसलो होतो त्या खोलीत ते आले, आम्हाला पाहिले आणि तिथून निघून गेले. अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुद्धा निघून गेले. जर पोलीस अधिकारी आमच्याशी बोलायलाच नकार देत असतील, तर मग ते आमच्यावर कसलेही आरोप कसे काय करू शकतात?, असा सवाल सौरव दास यांनी यावेळी केला.
आंदोलन करू द्यायचं नसेल तर…
पुढे ते म्हणाले की , आम्ही सरकारला, पोलिसांना सांगू इच्छितो की , 24 तासांची वेळ घ्या आणि लोकांनी कोणत्या दिवशी आंदोलनासाठी जंतर मंतरवर यावं हे सांगा. आम्ही एकत्र येऊ आणि शांततेत आंदोलन हे आंदोलन करू. पण आंदोलन तर होणारच एवढं मात्र नक्की. जर तुम्हाला आंदोलन करू द्यायचं नसेल तर संविधान बदला… संविधानातून आंदोलनाचा अधिकार काढून टाका. पण जोपर्यंत संविधानाने अधिकार दिला आहे तोपर्यंत आंदोलन करणारच, अशी स्पष्ट भूमिका सौरव दास यांनी माध्यमांसमोर मांडली.


























































