सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी तीन महिन्यांत एनओसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-mhada-lottery-delay-75000-applicants-waiting-for-2640-houses-draw-date

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकासकाला एनओसी देण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केले जाणार आहे. यामुळे अवघ्या तीन महिन्यांत एनओसी मिळणार आहे.

दक्षिण मुंबईत 12, 500 उपकरप्राप्त इमारती आहेत. सद्यस्थितीमध्ये इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 14 महिन्यांचा कालावधी लागत असून सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाते. ही प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी हे पोर्टल विकसित केले जात आहे. याद्वारे पुनर्विकासासाठी संबंधित विकासकाला ना-हरकत प्रमाणपत्र तीन महिन्यांत दिले जाणार आहे.

पुनर्विकास प्रकल्पाची सद्यस्थिती एका क्लिकवर 

म्हाडा वसाहतीमधील इमारतींचा पुनर्विकास, सेस इमारतींचा पुनर्विकास आणि समूह पुनर्विकास प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘म्हाडा’तर्फे पोर्टल विकसित केले जात आहे. या पोर्टलमध्ये विकासकाला बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्रगती अहवाल दर तीन महिन्यांनी अद्ययावत करायचा आहे. त्यामुळे म्हाडाच्या अभियंत्यांना पुनर्विकास प्रकल्पाची सद्यस्थिती एका क्लिकवर कळणार आहे.