
देशात महिला अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एकविसाव्या शतकातही चार भिंतींच्या आत होणारे मानसिक व शारीरिक शोषण, हुंड्यासाठीचा छळ, लैंगिक अत्याचार वाढत आहेत. माध्यमातून वेगवेगळ्या घटना समोर येत असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण बाहेर आले आहे. उत्तराखंडमधील भाजप सरकारमधील मंत्री रेखा आर्या यांनी पतीचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचा, फसवणूक केल्याचा आणि जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी गुरुवारी देहरादूनच्या कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेत्या आणि उत्तराखंडच्या महिला व बाल कल्याण मंत्री रेखा आर्या यांनी 15 ऑक्टोबर रोजी पती गिरधारी लाल साहू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. साहू यांनी आपल्यापासून पहिल्या विवाहाची गोष्ट लपवून ठेवली. तसेच आपल्याला मारहाण केली, धमकी दिली आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून कंपन्यांच्या संचालक पदावरून हटवले, असा आरोप रेखा आर्या यांनी केला. यावेळी त्यांनी एक ऑडिओ क्लिपचाही उल्लेख केला असून यात साहू आणि अन्य एक महिला आपल्याला जीवे मारण्याचा कट आखत असल्याचा आरोप रेखा आर्या यांनी केला.
रेखा आर्या यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपबीती सांगितली. यात त्या अस्वस्थ आणि ढसाढसा रडताना दिसत आहेत. तसेच मुलांच्या सुरक्षेबद्दलही त्या चिंता व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसनेही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Dehradun: Uttarakhand Cabinet Minister Rekha Arya has lodged an FIR against her husband, Girdhari Lal Sahu alias Pappu Girdhari, at the Cantt Police Station in Dehradun under Sections 120B, 323, 420, 467, 468, 471, 495, 498A, 504 and 506 of the Indian Penal Code (IPC), 1860, and Sections 3(1)(d), 3(1)(dh) and 3(2)(va) of the Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act, 1989.
In her complaint to the police, Cabinet Minister Rekha Arya has levelled serious allegations against her husband. She stated that she recently received an audio recording in which Girdhari Lal Sahu was allegedly heard speaking to a woman and conspiring to kill her. She further stated that she continues to face a threat to her life and the lives of her minor children, adding that he could carry out a serious incident at any time.
She further alleged that her husband’s behaviour towards her had changed over the past few months, during which she came to know about his alleged illicit relationships with other women. When she objected to these relationships, her husband initially admitted his mistakes and apologised to her both verbally and in writing. However, she alleged that he continued the same activities despite the apologies.
(File pic of Rekha Arya)
— ANI (@ANI) October 15, 2026
FIR मध्ये काय आरोप आहेत?
रेखा आर्या यांनी गुरुवारी सायंकाळी कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 6 जुलै 2004 रोजी उत्तर प्रदेशातील बरेली येथे साहू यांच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केला. मात्र साहू यांचे आधीच एक लग्न झाले होते आणि त्यांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवून ठेवल्याची माहिती अनेक वर्षानंतर कळली. तसेच पहिल्या पत्नीपासून त्यांना मुलेही असून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी संसार सुरू ठेवला, असे रेखा आर्या यांनी म्हटले. तसेच गेल्या काही महिन्यांपासून साहू यांचे वर्तन बदलले होते. त्यांचे अनैतिक संबंध होते. यावर आक्षेप घेतल्यावर त्यांनी माफीही मागितली. त्यानंतरही त्यांनी आपले वर्तन बदलले नाही. याला विरोध केल्यावर साहू यांनी आपल्याला मारहाण, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अनेकदा जातीवाचक शब्दही वापरले असे रेखा आर्या यांनी तक्रारीत म्हटले.
गुन्हा दाखल, तपास सुरू
रेखा आर्या यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदवला. पोलिसांना साहू यांच्यावर कलम 120 बी, 323, 420, 467, 468 आणि 471, 495, 498 ए, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 च्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
























































