आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी एचएसबीसी इंडियातर्फे २०० कोटी रुपयांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एचएसबीसी इंडियाने देशभरात आर्थिक साक्षरता आणखी सक्षम करण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी समाजकल्याण उपक्रमाची घोषणा केली आहे. हा उपक्रम चार वर्ष राबविला जाणार आहे. गरजू समुदायांना केवळ बँक खाते उघडणे किंवा कर्ज घेण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांचा बँकींग व्यवस्थेमध्ये सक्रियपणे सहभाग वाढविणे, तसेच ज्ञानसंपन्न बनविण्यावर हा उपक्रम आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. हा उपक्रम सर्वसामान्य व्यक्तींना बँक आणि डिजिटल वित्तीय सेवांचा सुरक्षितपणे वापर कसा करावा हे शिकविणे, माहितीच्या आधारे निर्णय घेणे, फसवणुकीपासून स्वतःचे रक्षण करणे आणि आपली उपजीविका व आर्थिक लवचिकता मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, आत्मविश्वास आणि व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणार आहे.

एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसीच्या ग्रुप चीफ फायनान्शियल ऑफिसर पाम कौर यांनी या उपक्रमाचे उदघाटन केले. यावेळी एचएसबीसीचे आशिया आणि मध्य पूर्व विभागाचे बँकिंग प्रमुख जो मियाके, एचएसबीसीचे ग्रुप चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर ज्युलियन वेंटझेल, एचएसबीसी इंडियाचे सीईओ हितेंद्र दवे आणि एचएसबीसी इंडियाच्या एमडी व सस्टेनेबिलिटी विभागाच्या प्रमुख अलोका मजुमदार हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.