
मेट्रो स्थानकारवरील बॅग तपासणीदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित प्रवाशाला सीआयएसएफने ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जामा मशिद मेट्रो स्थानकावर सोमवारी ही घटना घडली. ताब्यात घेतलेल्या प्रवाशाने स्वतःची ओळख क्वालालंपूरहून आलेला एनआरआय असल्याचे सांगितले.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बॅगेज स्क्रीनिंग दरम्यान एक्स-रे बॅगेज तपासणी प्रणालीच्या स्क्रीनवर त्याच्या बॅगेत संशयास्पद वस्तू दिसली. यानंतर प्रवाशाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क जवानांनी त्याला स्टेशनच्या एक्झिट गेटजवळ पकडले. संशयित प्रवासी आणि त्याचे सामान पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



























































