मुंबईला लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकणार, आदित्य ठाकरे यांचा इशारा

”ज्यांना जे घोटाळे करायचे आहे ते करू द्या, जेवढं तुम्हाला करायचं आहे ते करा. पण 2024 ला आमचं सरकार येणार आहे. तेव्हा मुंबईला लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकणार, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटाला दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाय रोवून महा न्याय, महानिष्ठा देणारा शिवसेनेचा झंझावाती मेळावा शनिवारी प्रभादेवी येथे पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना मिंधे व भाजप सरकारवर सडकून टीका केली. ”ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांना तुरुंगात पाठवून पैसे मोजायला लावणार व जनतेचा पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत पाठवणार, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

”परवा आपण जनता की अदालत कार्यक्रम घेतला. आपली बाजू कशी बरोबर आहे सत्याची आहे ते दाखवलं. राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो किती खोटा बोगस निकाल दिला. त्यांना माझ्यावर अब्रुनुकसानीची खटला दाखल करायचा असेल तर तो करा. पण सत्यासाठी आम्ही फासावर जायलाही तयार आहोत. हा निकाल सगळीकडे दाखवला. सगळ्या वृत्तवाहिन्यांवर दाखवत होते. त्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज होते. त्यात एकच कमेंट होती यांनी लोकशाही संपवून टाकलेली आहे. आतापर्यंत इतर राजकीय पक्ष म्हणायचे की लोकशाही धोक्यात आहे. पण तेव्हा असं वाटायचं की 100 कोटीचा देश आहे. इलेक्शन कमीशन आहे न्यायव्यवस्था आहे, असा कसा देश धोक्यात येईल. पण आज नुसती लोकशाही धोक्यात नाही आली तर लोकशाही खरोखर संपवली आहे यांनी. दोन वर्षांपासून नगरपालिकांमध्ये निवडणूका झालेल्या नाहीत. नगसेवक नाही, लोकप्रतिनिधी नाहीत. महापौर नाही. जनता त्रस्त आहे. हैराण आहे. आणि हे 40 गद्दार निर्लज्जपणे प्रत्येक गल्लीत त्यांची मस्ती माज दाखवत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्र्याची सर्कस बघितली असले. दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री बोलत चालले आहेत. त्यांना स्वप्नात खुर्ची असायचं समोर देखील तशाच खुर्च्याच खुर्च्या दिसत होत्या. माणसं नव्हती. या मेळाव्यासाठी बाथरुम लावण्यासाठी 60 लाखाचा खर्च केला तो महापालिकेने केला. आम्ही इतके वर्ष मेळावा केला. पण कधीच महापालिकेच्या पैशातून खर्च नाही केला. पण या गद्दार गँग, चोरांच्या टोळीसाठी मोबाईल टॉयलेट लावण्यासाठी साठ लाख खर्च केला. अलिबाबा आणि 50 चोर राज्य लुटायाला आले आहेत. जनतेचा पैसा लुटत आहेत. पण आम्ही त्यांना राज्याला लुटू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

”चोरी करता तुम्ही आणि लोकं पकडता आमची. जनता की अदालत झाल्यानंतर हे सर्व वेडे झाले आहेत. दुसऱ्या दिवशी सूरज चव्हाणला अटक केली. त्या कंपनीच्या मूळ मालकाला अटक नाही. त्या कंपनीता काम करणाऱ्याला अटक. कारण मूळ मालक हा गद्दार गटात गेला आहे. किशोरी ताई दौऱ्यावर निघाल्या. त्यांना नोटीस. राजन साळवींच्या घरावर धाड, रोहीत पवारांना नोटीस. या सगळ्या लोकांना हैराण त्रस्त केलं जात आहे. ही लढाई फार महत्त्वाची ठरत आहे. ही लढाई आपण लढत आहोत. जिथे हुकुमशाह असतो. जिथे हुकुमशाहीची राजवट आलेली असते. तो हुकुमशाह डरपोक असतो. तो जेवढा पोकळ असतो तेवढा तो यंत्रणा वापरायला लागतो. हिटलर देखील असाच करायचा. त्याची सिक्रेट सर्व्हिस वापरायचा, जे जे सत्य बोलतात त्यांना हैराण करायचं काम या यंत्रणा करतात. जनता अदालत मधून सत्य जनतेसमोर आल्यानंतर वायकर साहेबांना नोटीस पाठवली जातेय. त्यांना धमक्या दिल्या जाताय़त, मिंधे भाजप गटात या नाहीतर जेलमध्ये टाकू. किशोरी पेडणेकर, राजन साळवी यांनाही अशा ऑफर दिल्या जातायत. पण त्या सगळ्यांनी यांना ठणकावून सांगितलं की देशासाठी फासावर जाऊ पण तुमंच्या गटात येणार नाही. याला बोलतात हिंमत म्हणतात. ज्यांचा आवाज संसदेपर्यंत जाऊ शकत नाही त्यांचा आवाज ऐकायचा यालाच देशभक्ती म्हणतात. ज्यांनी खा खा खल्ले आहे ते पचवू शकले नाहीत ते मिंधे भाजप कडे गेले आहेत. किती दबाव टाकायचा किती छळ करायचा. परिवाराला छळलं जातंय. जे कुणी सत्याच्या बाजूने आले की त्यांना सतवायचं. आमच्या पक्षात या असं सागंतात. हे असे निर्लज्ज प्रकार आम्ही कधी केले नव्हते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

माझ्या आजोबांना लोकांनी हिंदुहृदय़सम्राट ही पदवी दिली होती. देशात एकमेव हिंदुहृदयसम्राट असतील तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. मी त्यांच्यासोबत 22 वर्ष राहिलो आहे.कधीही बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी केला नाही. त्यांनी कधी हिंदुत्वाच्या नावावर पक्ष फोडला नाही. भ्रष्टाचार केला नाही. राम राज्या आणणं हे त्यांचंटं हिंदु्त्व होतं. प्राण जाये पर वचन ना जाये हे आमचं हिुदुत्व होतं. उद्धव साहेब नेहमी मला सांगतात की आदित्य लोकांना अशी वचनं द्यायची की जी आपण पूर्ण करू शकू. आपल्या पक्षाचा जाहीर नामा नसतो आपला वचननामा असतो. वचनं अशी द्यायची जी आपण पूर्ण करू. यांनी दिलेली कोणतीही वचनं पूर्ण झाली नाही. अच्छे दिन येणार होते. नोकऱ्या मिळणार होत्या पण ते काहीही झाले नाही. 15 लाख खात्यावर येणार होते ते देखील मिळाले नाहीत, उलट आपल्याच खिशातले गेले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आज या देशात व राज्यात आपण पाहतोय. आपल्या व भाजपच्या हिंदुत्वात फरक पडत चालला आहे. 2018 ला राम मंदिराबाबत कुणी बोलत नव्हतं तेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. आपण पहिल्यांदा बोललो होतो की पहिले मंदिर फिर सरकार. तेव्हा आपण भाजप सरकारला सांगत होतो की राम मंदिरासाठी कायदा आणा. राम मंदिराचा हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे भाजप सरकारने दिलेलेला नाही, असे आदित्य ठाकरे यांनी भाजपला सुनावले

”आपलं हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. जाती पाती समाजामध्ये धर्मामध्ये भांडण लावायचं आपलं हिंदुत्व नाही. आपल्या हिंदुत्वात महिलांना सन्मान द्यायचा आहे. यांनी बिल्कीस बानोच्या आरोपींना सोडलं. गुजरात सरकारने तो निर्णय घेतला मात्र खरा अधिकार तो महाराष्ट्र सरकारचा होता. पण हे यांचे हिंदुत्व. आपल्या हिंदुत्वात ज्याने कुणी महिलांवर हात उचलला मग तो कोणत्याही धर्माचा असो किंवा महिला कोणत्याही धर्माची असो त्याला फाशीवर चढवणं हिच शिक्षा आहे. यांच्या सरकारमधले एक कॅबिनेट मंत्री आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला शिवीगाळ केली. त्यांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या ते आजही मंत्री पदावर आहेत. आज जर उद्धव ठाकरेंचं सरकार असतं तर त्या मंत्र्याला जेलमध्ये टाकलं असतं , असे आदित्य ठाकरे यांनी सुनावलं.

”याच मतदारसंघात आपल्या काळात सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर व विशाखा ताईंना होते. मागच्याच वर्षी इकडच्या दोन टपोरी गद्दारांनी गणपती मिरवणूकीत बंदूक काढली होती. सगळ्यांनी पाहिलं होतं. ते मला शिव्या देत होते. हेच दोन टपोरी चिंधी चोर त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेले व तिथेही फायरिंग केलं. त्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट आहे. त्यांच्यातीलच एकाने मला हे सांगितलं आहे. पण आतापर्यंत त्यांचं बंदूक जप्त नाही झालं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. आमचं सरकार आल्यावर या टपोऱ्यांवर अतिरेक्यांसाठी वापरतात तो युएपीएचा कायदा आम्ही वापरणार. गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत गोळीबार करणाऱ्यांना अतिरेक्यांसारखंच वागवलं जाणार. पण आज दुर्दैव असं की हिंदुत्व हिंदुत्व करत जे सरकार आपल्या डोक्यावरप बसवलं आहे. याच सरकारने गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत गोळीबार करणाऱ्याला मंदिराचं अध्यक्ष केलं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”जनतेवर सगळीकडे अन्याय होतो. अनेक सामान्य घरातील मुलांचं तलाठी भरतीचं स्वप्न असतं. पण तिथेही घोटाळा झाला. तो घोटाळा सरकार मान्य करायला तयार नाही. एक व्यक्ती 2017 मध्ये पकडली गेली. तो तुरुंगात गेला. तिथून सुटला, परत एकदा पेपर फो़डला, परत आत गेला. आता परत परिक्षा दिली, त्याला 138 मार्क मिळाले आहेत. हे एक प्रकरण. दुसऱ्या प्रकरणात पेपर 200 मार्कांचा आहे आणि त्याला 214 गुण मिळाले आहेत. हा घोटाळा कसा चालणार. शेतकरी आधीच त्रासलेला आहे. अवकाळी पाऊस होतो, गारपिट, ओला गुष्काळ, ग्रामीण भागात सुरू असतेच. शेतकऱ्यांना वाटतं की आपली मुलं शहारत जावी व त्यांना नोकरी मिळावी. पण गेल्या दोन वर्षात आपल्याकडे एक तरी प्रोजक्ट आला आहे का? गेल्या दोन वर्षात एकच नोकरी मिळतेय खोके सरकारमध्ये जा आणि भ्रष्टाचार करा. हा उद्योग गेला गुजरातमध्ये, फिल्मफेअर गेला, आणखी आपल्या राज्यातलं काय काय गुजरातला पाठवलं आहे. वेदांत गेलं, फॉक्सकॉन, एअरबस, बल्क ड्रग पार्क, चाळीस गद्दार सगळे गुजरातला गेले. सुरतला गेलेले हे स्वत:ची सुरत कधीच आरशात पाहू शकणार नाहीत कारण यांच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले.

”पाच वर्षापूर्वी 370 कलम काढला. मलाही आनंद झाला. माझ्या आजोबांचे ते स्वप्न होते. पण मला असं वाटतं की यांनी एक वेगळं अन्यायाचं कलम आपल्या राज्यावर लावलं आहे. सर्व अन्याय महाराष्ट्रावर,उद्योग इथून दुसऱ्या राज्यात हलवायचे. मग रोजगार कसे मिळणार. यांना तर मंत्रालय जर हलवायचं असेल तर ते देखील सुरतला नेतील. किती दिवस हा अन्याय सहन करायचा. वरळीतलं रेसकोर्स आहे. ते या खोके सरकारला बिल्डरांच्या घश्यात गालायचं आहे. मी ही बातमी सर्वांसमोर आणली तेव्हा लोकांमध्ये हलचल व्हायला लागली. ऑनलाईन पेटीशन दाखल व्हायला लागलं. त्यानंतर पालिकेच्या प्रशासकांनी त्यांनी रेसकोर्सवर काही करणार नाही असं सांगितलं. अंडरग्राऊंड कारपार्क करू. कशाला करताय. हे आजचे प्रशासक सगळ्यात भ्रष्ट आहेत. मी त्यांना सांगितले आहे की जर परस्पर करार झाला तर आम्ही तिथे घोड्यांची शर्यत देखील होऊ देणार नाही. तिथे जाऊन बसू पण एक विटही तिथे लावू देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

दुसऱ्या बाजूला मुंबईत घोटाळे सुरू आहेत. गेल्या वर्षी १५ जानेवारीला रस्त्याचा घोटाळा समोर आणला होता. जे टेंडर तीन हजार कोटींच्या पुढे जायला नको होता ते सहा हजार कोटींवर गेलं. आजच्या पेपरमध्ये बातमी आहे या रस्त्यांच्या कंत्राटदारांवर 280 कोटींची पेनल्टी लागलेली आहे. ही लाजेची गोष्ट आहे. गेली दहा वर्ष मी रस्त्यांच्या कामावर लक्ष ठेवून आहे. सगळ्यांसोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरतो. ऑक्टोबर ते मे दरम्यान मोठ्या प्रमाणात ही कामं चालतात. या काळात मी स्वत: प्रत्येक महिन्यात रात्रीची रस्त्याची पाहणी करायचो. आणि आता यांनी यांनी सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे पण एकही रस्ता पूर्ण झालेला नाही. पण या चोरी करणाऱ्यांना एक रुपया सुद्धा मिळू देणार नाही. पुणे नाशिक सगळीकडे हिच परिस्थिती आहे. ठाण्यात तर लूट चालू आहे. आपण एक शपथ घेऊन पुढे चाललो आहोत. आपण यांना मुंबई लुटू देणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

”स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा 263 कोटींचा आहे. मी त्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यासाठी मला 12 फेब्रुवारीची तारिख दिली आहे. य़ात यांनी एका कंत्राटदार मित्राला 13 गोष्टी विकत घ्यायला सांगितल्या आहेत. यांनी 10 हजार कुंड्या मागवल्या आहेत पण त्यात झाडं कुठली लागणार हेच माहित नाही. जे सगळे घोटाळे आहेत ते करा जेवढं तुम्हाला करायचं आहे ते करा. 224 ला आमचं सरकार येणार आहे. त्यावेळी जेलमध्ये बसून तुम्हाला पैसे मोजायला लावणार व मुंबईकरांच्या तिजोरीत सर्व पैसा परत द्यायला लावनणार, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

कित्येक वर्ष माहपालिका जी तोट्यात होती ती आपण नफ्यात आणली. हे रामराज्या आपल्याला आणायचं आहे. पण आज पालिकेची काय अवस्था आहे. थकबाकी एवढी आहे की काही वर्षांनी आपण पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाही. फिरा अजून. दावोस नेदरलँड. फिरा गोवा, गुवाहटी. ही टोळी उद्धव साहेबांची होऊ शकलेली नाही ती तुमची काय होणार, असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले.

”निवडणूका जेव्हा येतील तेव्हा आपल्याला महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. जो न्याय आम्ही मागत आहोत. हा फक्त शिवसेनेसाठी नाही. हे जे राहुल नार्वेकर निकाल देत होते. तो निकाल संविधानाची पूजक म्हणून देणार होते की भाजपच्या संविधानानुसार होते ते त्यांनीच सांगावे. कितीही महाराष्ट्रावर अन्याय झाला. कितीही लुटेरु कब्जा करून राहिले असतील तरी एक मत इतिहास घडवू शकतो. आपण शिवरायांची पूजा करतो, स्वप्नात जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढायला सांगितले तर आपण ताडकण उभे राहू , आपण बाबासाहेबांच्या संविधानसाठी लढायला तयार आहोत. हा लढा मी फक्त माझ्या वडिलांसाठी, शिवसेननेसाठी देत नाहीए. हा लढा मी महाराष्ट्रासाठी लढत आहे. मी लढायला तयार आहे. तुम्ही सर्व माझे खरी शक्ती आहात. एकही गद्दाराला आपण जिंकू द्यायचं नाही कारण आता विजय जो होईल तो आपलाच होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

”या गद्दार निर्लज्ज सरकारला मी सांगतोय की वार करायचा तर समोरून या. आम्ही समोरून वार झेलायला तयार आहोत. आता आम्ही सहन करणार नाही. मी तर ठरवलं आहे की 2024 मध्ये सर्व निवडणूकांमध्ये एका सुद्धा गद्दाराला विधानसभा महापालिकेची पायरी चढू द्यायची नाही. माझ्यावर जे आरोप करत असतात मला शिव्या देत असतात तेव्हा मला बरं वाटतं की आपला बाण बरोबर लागलाय. त्यामुळे यापुढे मी लढत आहे आणि मी लढत राहणार, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.