अदानी समूहाची ग्रीन एनर्जीमध्ये 9350 कोटींची गुंतवणूक करण्याची मान्यता

adani-group

अदानी समूहाने त्यांचाच एक भाग असलेली उर्जा निर्मिती कंपनी अदानी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे. ही गुंतवणूक सुमारे 9350 कोटी रुपये इतकी असेल. 18 जानेवारी रोजी होणाऱ्या कंपनीच्या बैठकीत नियामक आणि वैधानिक अधिकाऱ्यांसह कंपनीच्या भागधारकांच्या परवानगीसाठी प्रस्ताव ठेवला जाणार आहे. या रकमेचा उपयोग कंपनी कर्जाची रक्कम फेडून त्याचा बोजा कमी करणे आणि कंपनीचे भांडवली खर्च भागवणे यांसाठी करेल.

स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बोर्डाने अदानी ग्रीन एनर्जीच्या प्रवर्तकांना 9350 कोटी रुपयांचे प्रिफरेन्शिअल वॉरंट जारी करण्याची मान्यता दिली आहे. त्याची किंमत 1480.75 रुपये प्रति शेअर अशी असेल. या रकमेतून कर्जाची परतफेड तसंच, कंपनीच्या उर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे इत्यादी खर्च केले जाणार आहेत.