लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात 530 कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यात लोकसभेची निवडणूक घोषित केल्यानंतर आतापर्यंत दारू, ड्रग्ज, रोख रक्कम असा तब्बल 530 कोटी 69 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर 1 हजार 600 अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात 1,595 इतकी अवैध शस्त्र्ाास्त्र्ाs आणि परवाने रद्द करून 1,110 शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. तर कायदा व सुव्यवस्थे अंतर्गत 1 मेपर्यंत 50,397 शस्त्र्ाास्त्र्ाs जमा करण्यात आलेली आहेत, अशी माहिती चोकलिंगम यांनी दिली. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी कायद्या अंतर्गत 1,11,878 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 49.95  कोटी रोख रक्कम,  36.80 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आली. त्याचबरोबर 129.89 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि 220.65 कोटींचे ड्रग्ज अशा एकूण 530कोटी 69 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.