काडीमात्र योगदान नसताना भाजपकडून कोस्टल रोडचे श्रेय घेण्याचा घृणास्पद प्रकार; आदित्य ठाकरे यांची घणाघाती टीका

कोस्टल रोडची एक मार्गिका नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. हा रोड 2023 साली बनून पूर्ण होणार होता. मात्र 2024चा मे महिना आला तरी अजून बरेच काम अपूर्ण आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा कोस्टल रोड बांधल्याचे श्रेय घेण्याचा घृणास्पद प्रकार भाजपकडून सुरू आहे. कोस्टल रोड उभारण्यात भाजपचे काडीमात्र योगदान नाही. उलट कोस्टल रोडला परवानगी देताना दोन वर्षांची रखडपट्टी करण्याचे काम भाजपच्या पेंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने केले, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरू असलेल्या जाहिरातबाजीत विकासकामे दाखवली जात असून त्यात मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱया कोस्टल रोडचा समावेश भाजपकडून केला गेला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया एक्सवरून कडाडून हल्ला चढवला.

भाजपने महानायक बच्चन यांचे रिट्विट करत पुन्हा श्रेय घेतले

कोस्टल रोडची संकल्पना राबवून ती प्रत्यक्षात आणण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मात्र आता सत्तेत आलेले मिंधेपवार आणि भाजप सरकार याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप नेहमी त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय बळकावण्याचे काम करत आले. कोस्टल रोडच्या बाबतीतही भाजपने हेच केले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी आज पुन्हा कोस्टल रोडच्या मार्गिकेवरून प्रवास करत कोस्टल रोडची तोंडभरून प्रशंसा करणारे ट्विट केले. हेच ट्विट भाजपने रिट्विट करत न पेलेल्या कामाचे श्रेय ढापण्याचे काम केले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 

कोस्टल रोड हा उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 

मुंबईतील वाहतूककाsंडी पह्डून इंधन, वेळ आणि पैसा वाचवणारा 10 किलोमीटरचा पर्यावरणपूरक कोस्टल रोड हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पूर्णपणे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उभा राहिलेला हा प्रकल्प आहे. मात्र हा मार्ग अजूनही पूर्णपणे तयार झालेला नाही. राज्यातील मिंधे सरकार दर महिन्याला याची डेडलाईन पुढे ढकलत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे घ्या पुरावे

कोस्टल रोडच्या कामाचे पुरावे आदित्य ठाकरे यांनी पह्टोसह सोबत एक्सवर जोडले आहेत. कोस्टल रोडचे भूमिपूजन करताना तसेच चीनमधून आणलेली टनेल बोअरिंग मशीन ज्याला आम्ही मावळा हे अभिमानस्पद नाव दिले आणि ज्याने मावळ्याप्रमाणे अभिमानास्पद काम केले, याची ही छायाचित्रे आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.