दोन तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईल बघताय, ड्रॅगन डोळे वटारणार!

परदेशातील असंख्य चुकीच्या गोष्टी आपल्या देशात सहज अंगीकारल्या गेल्या आहेत. लहान मुलांच्या डोळ्यासमोर मोबाईल ही एक अगदी साधी गोष्ट. नकळत्या 7-8 महिने वयाच्या मुलाच्या डोळ्यांसमोर स्वत:ची सोय म्हणून पालक मोबाईल धरतात. बडबडगीते, अंगाईगीते म्हणजेच so called rhymes मुलांना मोबाईलवरच पहायची सवय लावली जाते. आणि तोच मोबाईल हाती धरून मुलांची वाटचाल सुरु होते.

इतर प्रत्येक बाबतीत राक्षसी असलेल्या चीनने लहान मुलांच्या बाबतीत मात्र स्तुत्य निर्णय घेतला आहे. मुलांच्या स्मार्टफोनच्या वापरावर त्यांनी कठोर बंधने आणली आहेत. हा वापर दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवण्याची चीनची योजना आहे. ठरविल्याप्रमाणे झाल्यास चीन स्मार्टफोनच्या वापरासाठी जगातील काही सर्वात कठोर नियम लागू करेल.

चीनच्या सायबरस्पेस वॉचडॉगने हा प्रस्ताव मांडला आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्वे 2 सप्टेंबरपर्यंत खुली करण्यात येतील. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे पाच वेगवेगळ्या वयोगटांसाठी प्रतिबंध सुचवतात: 3, 3-8, 8-12, 12-16 आणि 16-18 वर्षाखालील. 8 वर्षांखालील मुलांसाठी, “मायनर मोड” दररोज फक्त 40 मिनिटांसाठी परवानगी देईल आणि 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे, “ऑनलाइन इंटरनेटवरून मुलांची गाणी, शिक्षण आणि इतर पालक-मुलांच्या सहवास कार्यक्रमांची शिफारस केली पाहिजे आणि त्यांचा जास्तीजास्त प्रसार केला पाहिजे.

16-18 वयोगटातील लोकांना दोन तासांचा वापर दिला जाईल पण “अल्पवयीन मुलांना रात्री 10 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत सेवा देण्यास बंदी आहे.”

हे कसे लागू केले जाईल बाबत अजूनही  अस्पष्टता आहे, परंतु मार्गदर्शक तत्त्वे पालकांसमोर ठेवली गेली आहेत. मसुद्यात म्हटले आहे की पालकांना मायनर मोडवर साइन इन करावे लागेल आणि साइन ऑफ करावे लागेल आणि दिशानिर्देश देशभरात लागू झाल्यानंतर त्यांना मोहिमेला पाठिंबा देण्यास सांगितले जाईल. मायनर मोड हे पालकांना त्यांची मुले उपकरणे कशी वापरतात हे पाहण्यासाठी ठराविक साधन पुरविण्यात येईल. जगातील टेक कंपन्यांवरही ही जबाबदारी नक्कीच त्रासदायक ठरणार आहे.