चिनी सैन्य थंडीने कुडकुडले;लडाख, तिबेट सीमेवर तैनात केले रोबोट

chinese-soldiers-in-ladakh

लडाख, तिबेटमधील कडाक्याची थंडी चिनी सैन्याला सहन होत नाही. चिनी सैनिक गारठले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी लष्करासमोर बर्फाच्छदित भागात चीनचे सैनिक उभे राहू शकत नाहीत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चीनने या भागात सशस्त्र्ा रोबोट आणि मानवरहित वाहने तैनात केली आहेत.

लडाखमध्ये पारा उणे 17 पर्यंत खाली घसरला आहे. तिबेटमध्येही शून्या खाली तापमान गेले आहे. या भयंकर थंडीत चिनी सैन्य गारठले आहे. ऑक्सिजन लेवलही या भागात कमी आहे. हिंदुस्थानी लष्कराचे जवान वर्षानुवर्षे या भागात तैनात असून, कडाक्याच्या थंडीतही चीनच्या कुरापतींचा सामना करण्यास जवान सज्ज आहेत.

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मिने रोबोट आणि मानवरहित वाहने तैनात केली आहेत. चिनी मिडियाच्या वृत्तानुसार तिबेटमध्ये 88 ऑटोमेटिक शार्प क्लॉ व्हीकल्स तैनात केले आहेत तर लडाख सीमेवर 38 शार्प क्लॉ वाहने तैनात करण्यात आली आहेत. रोबोटप्रमाणे लढणारे ऑटोमेटिक श्ल्त-200 मानवरहित वाहनेही तिबेट आणि लडाख सीमेवर तैनात केले आहेत. हे रोबोट 50 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. त्याचप्रमाणे एकाचवेळी 200 किलो दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतात. मशिनगनने सज्ज हे रोबोट आहेत.

कुरापती सुरूच; अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे बदलली

चिनी लालमाकडांच्या कुरापती सुरूच आहेत. अरुणाचल प्रदेशवर पुन्हा दावा सांगणाऱया चीनने तेथील 15 ठिकाणांची नावे चीनी, तिबेटीयन आणि रोमन भाषेत बदलली आहेत. चीन सरकारकडून अरूणाचल प्रदेशला Zangan असे म्हटले जाते. आता आठ निवासी भागांचे नावे बदलली. तसेच पाच डोंगर आणि दोन नद्यांचीही नावे बदलण्यात आली आहेत.