मगरीच्या हल्ल्यात फुटबॉलपटूचा  मृत्यू… मृतदेह मिळविण्यासाठी मगरीचाही बळी

वन्यजीव आणि माणूस हा संघर्ष केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही तर परदेशातही याची झळ दोघांनाही बसते आहे. वन्यप्राण्यांच्या अधिवासावर जेव्हा मानवी अतिक्रमणे होतात तेव्हा या संघर्षाला अधिकच धार चढते. फुटबॉलपटू जीजस अल्बर्टो लोपेझ ऑर्टिज हा चुचो नावानं प्रसिद्ध होता. डेपोर्टिवो रियो कैनास टीमकडून तो फुटबॉल खेळायचा.  फुटबॉल सामना संपल्यानंतर लोपेझ नदीत पोहायला गेला असताना  मगरीनं त्याच्यावर  हल्ला केला. आसपासच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.  २९ वर्षीय ऑर्टिजचा  मगरीच्या हल्ल्यात  जीव गेला.

ऑर्टिजचा मृतदेह मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले पण  मगर त्याचा मृतदेह सोडत नव्हती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी मगरीवर गोळी झाडली. मगरीवर गोळी झाडली नसती तर मृतदेह मिळवणं अवघड गेलं असतं, असं पोलिसांनी सांगितलं.  लोपेझला  दोन मुलं आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबानं लोकांकडे मदतीची मागणी केली आहे.