हा देवी कालीचा रंग, हक्कांसाठी निषेध सुरूच राहणार ! द्रमुकला ‘काळा टीका’ म्हणणाऱ्या मोदींना कनिमोळी यांचे जोरदार प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dmks-kanimozhi-hits-back-at-pm-says-black-is-colour-of-goddess-kali

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात द्रमुकच्या (DMK) आंदोलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या कामाला ‘दृष्ट’ लागू नये म्हणून लावलेला ‘काला टीका’ (काळा टिळा) अशी टिप्पणी केली होती. त्याला द्रमुक नेत्या कनिमोळी यांनी शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. काळा हा देवी कालीचा रंग असून, या मुद्द्यावर तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेला डीएमके शेवटपर्यंत आंदोलन करत राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कनिमोळी यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना काळ्या रंगाचे आध्यात्मिक आणि संघर्षाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की काळा रंग केवळ ‘दृष्ट’ काढण्यासाठी नसून तो शक्तीचे प्रतीक असलेल्या ‘देवी काली’चा रंग आहे आणि हक्क मिळेपर्यंत द्रमुकचा हा निषेध सुरूच राहील.

गुरुवारी लोकसभेत नवीन विधेयकांच्या चर्चेत बोलताना पंतप्रधान मोदींनी द्रमुक सदस्यांवर निशाणा साधला होता. सुधारणा विधेयकाचा निषेध करण्यासाठी काळे कपडे घालून आलेल्या द्रमुक सदस्यांकडे पाहून पंतप्रधान म्हणाले होते की, हे एखाद्या ‘काळ्या टिळ्या’ सारखे आहे, ज्यामुळे वाईट नजर लागत नाही. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी ‘काळा टिळा’ लावण्याची परंपरा आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले होते.