Electoral Bond Scam – टॉप 10 कंपन्यांकडून भाजपला मिळाले 2288 कोटी

स्टेट बँकेने 21 मार्चला इलेक्टोरल बॉण्डचा विशेष क्रमांकासह सर्व तपशील निवडणूक आयोगाला सादर केला. त्यानंतर भाजपवर कशाप्रकारे निधीची खैरात झाली याची माहिती बाहेर येत आहे. टॉप 10 कंपन्यांकडून भाजपला तब्बल 2 हजार 288 कोटी रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. मेघा इंजी अँड इन्फ्रा आणि या कंपनीची उपकंपनी यूपी पावर या तीन कंपन्यांनी सर्वाधिक निवडणूक रोखे खरेदी केले. मेघा इंडी अँड इन्फा कंपनीने भाजपला 664 कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे.

मेघा इंजी अँड इन्फ्रा या कंपनीने भारत राष्ट्र समितीलाही तब्बल 390 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. तर काँग्रेसला वेदांता ग्रुपने 104 कोटी रुपये दिले आणि फ्यूचर गेमिंग अँट हॉटेल या कंपनीने तृणमूल काँग्रेसला 542 कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या.

भाजप – एकूण 6060.51 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. यातील 2288 कोटी रुपयांच्या देणग्या टॉप टेन कंपन्यांकडून मिळाल्या.

काँग्रेस – 1421 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. यातील 615 कोटी रुपये टॉप टेन कंपन्यांकडून मिळाले

टीएमसी – 1609.53 कोटींच्या देणग्या मिळाल्या. यातील 1160 कोटी रुपये टॉप टेन कंपन्यांकडून मिळाले.

कुणी किती देणग्या दिल्या…

वेदांता भाजपा, काँग्रेस, बिजद, तृणमूल
एअरटेल भाजपा, राजद, शिअद, काँग्रेस, जदयू
मुथूट भाजपा, एनसीपी
बजाज समूह भाजपा, आप
केवेंटर भाजपा, काँग्रेस
अपोलो टायर काँग्रेस
रुंगटा सन्स भाजपा
पिरामल पॅपिटल-सन फार्मा भाजपा
नाटको फार्मा भाजपा, टीडीपी, तृणमूल, बीआरएस

भाजपला या कंपन्यांकडूनही सर्वाधिक देणग्या

  • मेघा इंजिनीअरिंग – 584 कोटी
  • क्विक सप्लाय चेन – 375 कोटी
    भारती एअरटेल – 197.4 कोटी
  • मदनलाल लिमिटेड – 175.5 कोटी
  • केवेंटर फूड पार्क – 144.5 कोटी
  • डीएलएफ – 130 कोटी
  • बिर्ला कार्बन – 105 कोटी
  • फ्युचर गेमिंग – 100 कोटी
  • हालदिया एनर्जी – 81 कोटी

अरबिंदो फार्माचा इलेक्टोरल बॉण्डस् घोटाळा उघड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या अबकारी नीतीसंबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक केली, त्या प्रकरणात अरबिंदो फार्माचे संचालक पी. सरथचंद्र रेड्डी हेसुद्धा आरोपी आहेत. ईडीने रेड्डी यांना 10 नोव्हेंबर 2022 रोजी मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर अवघ्या पाच दिवसांत म्हणजेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी अरबिंदो फार्माने 5 कोटी रुपयांचा इलेक्टोरल बॉण्ड खरेदी केले. 21 नोव्हेंबर 2022ला भाजपने वटवले. ईडीने अटक केल्यानंतर पाचव्या दिवशी भाजपला देणगी देण्यात आली. यानंतर काही महिन्यांतच अरबिंदो कंपनीच्या संचालकाला या प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले. हा सर्व घोटाळा आता चव्हाटय़ावर आल्याने भाजपची पार अब्रू गेली आहे.