बुढ्ढेमें है दम! मर्डोक पाचव्यांदा बोहल्यावर चढणार

प्रसिद्ध अब्जाधीश आणि ‘मीडिया मुगल’ या नावाने ओळखले जाणारे रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा बोहल्यावर चढणार असून ते रशियातील मॉस्कोमध्ये राहणाऱया 67 वर्षीय एलेना झकोवा यांच्याशी लग्नगाठ बांधणार आहेत. मर्डोक हे 92 वर्षांचे आहेत. हा विवाह सोहळा पॅलिपहर्नियात होणार आहे. मर्डोक यांनी नुकताच फॉक्स आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मर्डोक यांनी याआधी चार विवाह केले आहेत. त्यांचा चौथा विवाह मॉडल आणि प्रसिद्ध अभिनेत्री जेली हॉल यांच्याशी झाला होता. सहा वर्षांनंतर हे दोघे विभक्त झाले. मर्डोक आणि एलेना झकोवा यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून आता विवाह सोहळय़ाची तयारी जोरात सुरू आहे. एलेना झकोवा मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट पदावरून निवृत्त झालेल्या आहेत. गेल्या वर्षापासून मर्डोक आणि एलेना हे दोघे एकमेकांना डेट करीत आहेत.

वय वर्षे फक्त 92

रुपर्ट मर्डोक यांचा पहिला विवाह 1956 साली 29 व्या वर्षी पॅट्रिशिया बुकरसोबत झाला. 1967 ला हे दोघे विभक्त झाले. दुसरा विवाह एन्ना टॉर्वशी झाला. हा विवाह 1999 पर्यंत टिकला. त्यानंतर तिसरा विवाह वेंडी डेंगशी झाला, तो 2013 पर्यंत टिकला. चौथा विवाह 2016 साली जेर्री हेलशी झाला, तो 2022 पर्यंत टिकला. आता 2024 ला मर्डोक पाचवा विवाह करत असून या विवाहावेळी त्यांचे वय 92 वर्षे आहे.