गोल बुबुळे असलेल्या पालींचा शोध अत्यंत वैशिष्टय़पूर्ण, तेजस ठाकरेंच्या संशोधनाची फोर्ब्स मासिकाकडून दखल

पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने मिळवलेल्या यशाची जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने दखल घेतली आहे. गोल बुबुळे असलेल्या पालींचा शोध अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असल्याचे फोर्ब्स ने  म्हटले आहे. तसेच ‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ या प्रजातीच्या नामकरणाचेही विशेष कौतुक केले आहे.

जगभरातून ‘नॅशनल जिओग्राफिक’, ‘हायपर ऍलर्जिक’, ‘मायामी हेराल्ड’ आदी माध्यमांकडून ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधनाची दखल घेतली गेली आहे. याचदरम्यान ‘पर्ह्ब्ज’ मासिकाने संशोधनाची वाहवा केली आहे. ज्यावेळी पाल सापडली त्यावेळी पालीचा रंग नावाजलेले चित्रकार वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ या चित्राशी मिळताजुळता दिसला. त्यावरून पालीचे नाव ‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ असे ठेवण्याची कल्पना तेजस ठाकरे यांना पहिल्यांदा सुचली होती. या नामकरणाचे विशेष काwतुक ‘ फोर्ब्स  ’ मासिकाने केले आहे. ‘अत्यंत वैशिष्टय़पूर्ण’ अशी दाद मिळालेल्या या संशोधनामध्ये तेजस ठाकरे यांच्यासह अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी सहभाग घेतला होता. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात केला असून गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळेच पालींच्या संशोधनावर देशविदेशातून अखंडितपणे काwतुकाचा वर्षाव सुरू राहिला आहे.लींची महत्त्वाची वैशिष्टय़े

  • ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या हिंदुस्थानी द्वीपकल्पामधील पालींच्या सर्वेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळल्या. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.
  • रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील टय़ुबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपण यावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळय़ा ठरतात.
  • नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

नामकरणाचे विशेष कौतुक

‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ प्रजात तामीळनाडूच्या श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली, तर ‘निमास्पिस सथुरागिरीएन्सिस’ ही प्रजात तामीळनाडूच्या विरुदुनगर जिह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळली. निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरून केले आहे. पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ या चित्राशी मिळतीजुळती दिसली.