राजस्थानमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू तर 2 मुलं गंभीर

राजस्थानमध्ये सवाई माधोपुर जिल्ह्यात रविवारी भीषण अपघात घडला आहे. जिल्ह्यातील बोली परिसरात कार आणि एका वाहनामध्ये जबरदस्त टक्कर झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील 6 लोकांचा मृत्यू झाला असून 2 मुलं गंभीर जखमी झाले आहेत. अपघातील सर्व लोकं सीकर जिल्ह्यातील खंडेला येथील रहिवासी आहेत.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपघातातील सर्व लोकं सीकर येथील गणेशाचे दर्शन घ्यायला सवाई माधोपुरच्या रणथंभोरला जात होते. त्या दरम्यान हा अपघात झाला. पोलिस अधीक्षक दिनेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाउली पोलीस स्टेशनला एक्स्प्रेस वेवर अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. प्रथमदर्शनी हा अपघात अज्ञात वाहनाच्या धडकेने झाल्याचे बोलले जात आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारचे मोठे नुकसान झाले. कारमधून मृतदेह बाहेर काढणे कठीण होते. या अपघातात जखमी झालेल्या दीपाली शर्मा (6) आणि मनन शर्मा (10) यांना सामुदायिक आरोग्य केंद्र, बोवली येथे दाखल करण्यात आले आहे. जिथे प्राथमिक उपचारानंतर त्याला जयपूरला रेफर करण्यात आले.

बोली पोलिसांनी सांगितले की, सर्व मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. सीकरच्या खंडेला पासून सवाई माधोपुरच्या रणथंभोर जवळील गणेशाचे दर्शन घ्यायला जात होते. मृतकांमध्ये अनीता, संतोष, कैलाश, पूनम, मनीष आणि सतीश शर्मा अशी आहेत. अपघातानंतर ग्रामीणांच्या मदतीने मृतांसाठी रूग्णवाहिका बोलावून त्यांना शवगृहात नेण्यात आले. याप्रकरणी एएसीपी दिनेश यादव आणि डेप्युटी अंगद शर्मा घटनास्थळी पोहोचले. पोलीस सध्या त्या वाहनाचा शोध घेत आहे, नातेवाईक आल्यानंतर मृतांचे शवविच्छेदन करण्यात येईल.