मिंधे गटाचे युवासेना उपविभाग अधिकारी अब्दुल्ला चौगले यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश

मंडणगडात मिंधे गटाला चांगलेच भले मोठे भगदाड पडले आहे. रायगड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या जाहीर निवडणुक प्रचाराच्या समारोपाला काही क्षण उरले असतानाच रविवारी मंडणगड तालूक्यातील मिंधे गटाच्या युवासेनेच्या एका उपविभाग अधिकाऱ्याने विभागातील सहकाऱ्यांसह माजी आम. संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि मंडणगड तालूका शिवसेना तालूका प्रमुख संतोष गोवले, मंडणगड तालूका महिला आघाडी संघटीका शर्मिला कदम,युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी गणेश बिल्लार, मनोहर गुजर, आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आम. संजय कदम यांच्या कुशल नेर्तृत्वाखाली मंडणगड दापोली, खेड तालूक्यातील मिंधे गटाला सुरूंग लावण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुक प्रचाराचा सुरू असलेला झंझावात, ठिक ठिकाणच्या जाहीर सभांमधून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भाषणांमधून देशहीतांच्या विचारांची पेरणी होत आहे. तसेच शिवसेना नेते युवासेना प्रगमुख आदित्य ठाकरे यांचा मंडणगड येथील नुकताच झालेला दौरा या दौ-यातील जाहीर सभेत या युवकाने दिलेल्या देशहीताच्या विचाराने लोक प्रेरीत होत आहेत.

गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करू लागली आहेत. यातच ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होत रविवारी 5 मे रोजी मिंधे गटाचे मंडणगड तालूक्यातील युवासेनेचे उपविभाग प्रमुख अब्दुल्ला अब्दुलगणी चैगले यांनी विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेशकर्त्या चौगले यांचा केवळ विभागापुरताच जनसंपर्क सिमित वा मर्यादीत नाही. त्यामुळे चौगले यांच्या पक्षप्रवेशामुळे मंडणगडात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटनेला चांगलीच उभारी मिळणार आहे.

माजी आम. संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघात करत असलेल्या समाजहिताच्या विधायक कामाने प्रभावित होत अनेकजन परत आपल्यामूळे शिवसेना पक्षात परतत आहेत. अशातच आम. योगेश कदम यांचे खंदे समर्थक असलेल्या अब्दुल्ला अब्दुलगणी चौगले यांनी रविवारी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश करून मिंधे गटाला चांगलाच दणका दिला आहे.