मालमत्ता जप्तीच्या प्रस्तावात जाणूनबुजून त्रुटी ठेवल्या का? कोर्टाकडून ठाणे पोलिसांची कानउघाडणी

घोडबंदर रोड येथील भूखंड हडप केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. मेहता यांनी हडप केलेल्या मालमत्तांच्या जप्तीसंबंधी प्रस्तावात जाणूनबुजून त्रुटी ठेवल्या का? आम्हाला याचे स्पष्टीकरण हवेय, अशी कठोर भूमिका घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी ठाणे पोलिसांना फैलावर घेतले.

मीरा-भाईंदर येथील व्यावसायिक जय शुक्ला यांनी नरेंद्र मेहतांवर कारवाईची मागणी करीत याचिका केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी याचिकाकर्त्यातर्फे ऍड. यशोदीप देशमुख व ऍड. विनोद सांगवीकर यांनी बाजू मांडली. पोलिसांनी मागील सुनावणी वेळी तपासाचा प्रगत अहवाल सादर केला होता. तथापि, मालमत्ता जप्तीच्या प्रस्तावात त्रुटी ठेवल्याची गंभीर दखल खंडपीठाने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रस्ताव पाठवणारा अधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त डीजीपींना हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

सिंपन परिवार स्नेहमेळाव्याचे आयोजन

दादरच्या शिवाजी मंदिर येथे 28 एप्रिलला सिंपन परिवार स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अद्वैत थिएटर निर्मित ‘करून गेलो गावं’ या नाटय़प्रयोगाचे आयोजन शिवाजी नाटय़ मंदिर येथे सकाळी 10ः30 वाजता करण्यात आले आहे. या स्नेहमेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, असे सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे, कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, कोषाध्यक्ष दत्ता पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. सिंपन प्रतिष्ठानचा हा सहावा वर्धापन दिन आहे.

महिला कर्मचाऱयांचे कार्यालयीन ठिकाणी होणाऱया लैंगिक छळाविरोधी जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्त्राr संसाधन केंद्राच्या मुख्य तक्रार समितीकडून माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात झाले. यावेळी सहआयुक्त मिलिन सावंत, उपायुक्त (शिक्षण) तथा महिला कर्मचाऱयाचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळविरोधी समितीच्या अध्यक्षा चंदा जाधव, सचिव अपूर्वा प्रभू, आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे आदी उपस्थित होते.

सोनी बीबीसी चॅनेलने नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम सच्या (एनसीएसएम) सहयोगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी नेहरू सायन्स सेंटरमध्ये ‘समर मुव्ही फेस्टिव्हल’चे आयोजन केले. विद्यार्थ्यांना विज्ञान, वन्य जीवन, साहस व एक्स्प्लोरेशन शैलींमधील कन्टेन्टचे मनोरंजन दिले जात आहे. बेंगळुरूमध्ये या फेस्टिव्हलला सुरुवात झाली. मुंबईमध्ये 22 एप्रिल रोजी इव्हेंटला सुरुवात झाली आणि तीन दिवसांमध्ये आरएन पोद्दार, पोद्दार इंटरनॅशनल, गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल, आयटीआय बोरिवली आणि बालमोहन विद्यामंदिर अशा शाळांमधील 580 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.