घरभाडे भत्त्याच्या नावाने करचुकवेगिरी; आयकर विभागाच्या रडारवर, बनावट पॅनकार्डद्वारे फसवणूक

घरभाडे भत्त्याच्या (एचआरए) नावाने कर चुकवणाऱयांचा आयकर विभागाने शोध घेतला आहे. दुसऱयाच्या पॅनकार्डचा बेकायदेशीरपणे वापर करून एचआरएचा दावा केला जातो. प्रत्यक्षात ते भाडेकरू नसतात. अशी तब्बल 8 ते 10 हजार प्रकरणे आयकर विभागाच्या हाती लागली आहेत. अशा प्रकारे दहा लाख ते कोटय़वधी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

धक्कादायक बाब म्हणजे कर सवलत घेण्यासाठी काही पंपन्यांचे कर्मचारी अशी अफरातफर करत आहेत. ज्या पॅनकार्डद्वारे ही फसवणूक होत आहे त्याचाच आधार घेत पंपन्या कर सवलतीसाठी दावा करत आहेत, असेही आयकर विभागाच्या चौकशीतून समोर आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण
तब्बल एक रुपयाच्या भाडे पावत्या आयकर विभागाला सापडल्या. पॅनकार्डद्वारे आयकर खात्याने या भाडे पावत्या जमा करणाऱ्यांचा शोध घेतला. या भाडे पावत्या आमच्या नाहीत. आम्हाला कोणत्याही प्रकारचे भाडे मिळत नाही, असे या सर्वांनी आयकर विभागाला सांगितले. तेथे हे प्रकरण उघडकीस आले.

कारवाईत अडथळा
पॅनकार्डद्वारे कर चुकवला जात आहे, पण भलत्याचेच पॅनकार्ड वापरून ही फसवणूक होत असल्याने कारवाई कोणावर करावी, असा प्रश्न आयकर विभागासमोर आहे, मात्र घरभाडे भत्त्याचे चुकीचे दावे शोधणे अधिक सोपे आहे. कारण बहुतांश आर्थिक व्यवहारात पॅनकार्ड जोडलेले असते. अशा प्रकरणात कारवाई केली जाते.

कर्मचारीच जबाबदार
घरभाडे भत्त्याद्वारे करचुकवेगिरी करण्यात सर्वस्वी दोषी कर्मचारी असतो. यात कंपनी अथाव पालक संस्थेची काहीच जबाबदारी नसते. तरीही पंपनीने घरभाडे भत्त्याची कागदपत्रे तपासायला हवीत. एचआरए किंवा एलटीएची खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचे काही पंपन्यांचे धोरण असल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱयाने सांगितले.