जंतर मंतरवर ज्यांनी मला शिव्या दिल्या त्यांना माफ करतो – मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनामध्ये काही खोडसाळ मुलांनी मला आणि माझ्या स्वर्गवासी आईला शिव्या दिल्या. मात्र, ही भरकटलेली मुले असून मी त्यांना माफ करू इच्छितो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी यांनी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करत आंदोलनावर भाष्य केले.  आंदोलनादरम्यान कोणत्याही सभ्य समाजाला शोभणार नाही, अशा शब्दांचा वापर केला गेला. मी समाजातील आक्रोश जाणतो. मात्र, हा एक सांस्कृतिक धक्का आहे, आपल्या मुली अशी भाषा कशा काय वापरू शकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

n या भरकटलेल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणे आपले काम आहे. त्यांना शिक्षा देणे, न्यायालयात चकरा मारायला लावणे, यातून परिस्थिती बदलणार नाही. कधीकधी दातांखाली जीभ येते. पण, म्हणून दात तोडत नाही, असे नमूद करत आपण देशासाठी एकत्र येऊन पुढे जाऊ, असे आवाहन मोदींनी केले.