शहजाद पूनावाला यांचा भाजपला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर देशभरातून टीकेचे धनी झालेल्या भाजपला आज एक धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक मानले जाणारे भाजपचे राष्ट्रीय प्रवत्ते शहजाद पूनावाला यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर पूनावाला यांनी त्यांच्या ‘एक्स’ हॅंडलच्या बायोमधून ‘भाजप’ हा शब्द हटवला आहे. नवीन बायोमध्ये त्यांनी स्वतःची ओळख ‘भारतीय’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आजीवन अनुयायी’ अशी करून दिली आहे.